आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे श्री हनुमान जन्मोत्सवाला उपस्थिती
सियावर रामचंद्र की जय,
पवनसूत हनुमान की जय…
🙏🏻 जय श्री हनुमान ! 🚩
शंकर सुवन केसरी नंदन |
तेज प्रताप महा जग वंदन ||
🗓️ दि. २३ एप्रिल/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील श्री हनुमान (जागृत) देवस्थान व श्री मारुती मंदिर (बेघर) खडसंगी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी भक्तिमय वातावरणात श्री हनुमानजींची पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधून हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. तसेच, श्री हनुमान देवस्थानचे स्वयंपाक गृह, माँ माणिका देवी सभागृह बांधकाम व श्री संत जगनाडे महाराज सभागृह नियोजित जागेची पाहणी करून आढावा घेतला. दरम्यान, देवस्थानच्या वतीने उपस्थित भाविकांनी आमदार बंटीभाऊंचे औक्षण करत भगवा दुपट्टा भेट देऊन स्वागत केले.
यावेळी प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा युवा नेते समीर राचलवार, भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बन्सोड, भाजयुमो तालुका महामंत्री सचिन डाहुले, भाजयुमो चिमूर शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री श्रेयश लाखे, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री निखिल भुते, श्री हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अरुण प्रसाद, सचिव विनायक औतकर सर, उपाध्यक्ष दशरथ नन्नावरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वेणूदास बारेकर, नाना मेश्राम, रवि कोलते, डॉ. दीपक दडमल, प्रमोद श्रीरामे, भूषण सातपुते, हरिकृष्ण कामडी, सचिन मेश्राम, औतकर मॅडम, प्रकाश असावा, संदेश सातपैसे, मोहन समर्थ, विलास तराळे, सतीश देहारे, शंकर सुरतकर, नारायण शेंडे, मारोती समर्थ व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.