आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार मा. डॉ. हेमंतभाऊ विष्णू सावरा यांच्या प्रचारार्थ दौरा

 आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार मा. डॉ. हेमंतभाऊ विष्णू सावरा यांच्या प्रचारार्थ दौरा 



🗓️ दि. १८ मे/ चिमूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय *आमदार श्री. कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्यासमवेत *गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. नामदेवभाऊ उसेंडी व भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत* यांच्या प्रमुख उपस्थितीत नालासोपारा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत वसई विरार क्षेत्रातील बिलालपाडा येथे *भाजपा नेते तथा झोपडपट्टी क्षेत्र अध्यक्ष श्री. संदीपभाऊ मिश्रा* यांच्या निवासस्थानी पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच, झोपडपट्टी क्षेत्रात प्रचार मोहीम राबविल्यानंतर भक्तीमय वातावरणात श्री शिव मंदिर येथे मनोभावे दर्शन घेतले.



दरम्यान, भाजपाच्या वतीने *आमदार श्री. कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* व उपस्थित मान्यवरांचे औक्षण करत शाल-श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा चिमूर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा युवा नेते समीर राचलवार तसेच नालासोपारा व चिमूर विधानसभा क्षेत्रातील विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


#प्रचार #दौरा #भाजपामहायुती #महाराष्ट्र #Maharashtra #पालघर #वसई #विरार #नालासोपारा #Palghar #Vasai #Virar #Nalasopara #Mahayuti #AbkiBaar400Paar 

#ModiKiGuarantee

#PalgharLoksabha #DrHemantVishnuSavara #BuntyBhangdiya