आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील श्री हनुमान मंदिर, देवस्थान कवडशी (डाक) येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
सियावर रामचंद्र की जय,
पवनसूत हनुमान की जय…
🙏🏻 जय श्री हनुमान ! 🚩
राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥
🗓️ दि. २३ एप्रिल/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील श्री हनुमान मंदिर, देवस्थान कवडशी (डाक) येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी भक्तिमय वातावरणात श्री हनुमानजींची पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधून हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. दरम्यान, समस्त कवडशी (डाक) ग्रामवासीयांच्या वतीने उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस प्रफुल कोलते, भाजपा नेते राजू ठाकरे, भाजपा महिला आघाडी तालुका पदाधिकारी ज्योतीताई ठाकरे, सरपंच ग्रा. पं. कवडशी (डाक) शुभम ठाकरे, दशरथ नन्नावरे, हरिभाऊ सातपुते, संभाजी खेकारे , श्रीकृष्ण सातपुते, पुरुषोत्तम श्रीरामे, रितेश ठाकरे, प्रफुल ढोणे, दीपक श्रीरामे, नितिन श्रीरामे, प्रवीण सातपूते, मंगेश ठाकरे व अन्य मान्यवर आणि भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.