*आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे यांच्या प्रचारार्थ लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर येथे पदयात्रा :*
*आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या पदयात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद*
🗓️ दि. ५ मे/ *चिमूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्यासमवेत *भाजपा नेते श्री. ऋषिकेश रमेशअप्पा कराड* यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर येथे *लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे* यांच्या प्रचारार्थ पदयात्रा पार पडली. या पदयात्रेच्या प्रारंभी सर्वप्रथम रेणापूरला ८०० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक वारसा लाभलेले ग्रामदैवत, लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान आदिशक्ती श्री रेणुकादेवी मंदिर आणि श्री विठ्ठल-रुख्मिनी मंदिर, श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे भक्तीमय वातावरणात पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले.
तसेच, या पदयात्रेदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेणापूर येथील विविध बुथवर निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी तैनात असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, तळोधी (बा.), सिंदेवाही, नवरगाव भागातील विविध होमगार्ड बांधवांनी *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांची आपुलकीने भेट घेतली.
या पदयात्रेप्रसंगी *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी स्थानिक नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधून लोकसभा निवडणुकीत *भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे* यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान, ठिकठिकाणी *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांचे आगमनाप्रसंगी वाजतगाजत, जल्लोषात स्वागत करण्यात आले. या पदयात्रेचा समारोप *आमदार श्री. रमेशअप्पा कराड* यांच्या जनसंपर्क कार्यालयात झाला. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांचा प्रभू श्रीराम व श्री विठ्ठल-रुख्मिनी ची मूर्ती, भगवी शाल, पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत-सत्कार करण्यात आला.
या पदयात्रेत भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, संजय गांधी निराधार योजना समिती चिमूर अध्यक्ष संजय नवघडे, माजी सभापती/नगरसेवक नगर परिषद चिमूर सतीश जाधव, भाजपा युवा नेते प्रकाश असावा आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातील महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी होते.
#प्रचार #दौरा #भाजपामहायुती #लातूर #लातूरग्रामीण #रेणापूर #mahayuti #laturRural #mahayuti #SudhakarShrungare #RameshKarad #BuntyBhangdiya