आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्री हनुमान मंदिर, देवस्थान कोसंबी (गवळी) येथे श्री हनुमान जन्मोत्सव महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरीनाम श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या समारोपीय गोपाळकाला व महाप्रसाद कार्यक्रमाला उपस्तिथी दर्शविली.....
सियावर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय…
🙏🏻 जय श्री हनुमान ! 🚩
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।
🗓️ दि. २३ एप्रिल/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील श्री हनुमान मंदिर, देवस्थान कोसंबी (गवळी) येथे श्री हनुमान जयंती महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरीनाम श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या समारोपीय गोपाळकाला व महाप्रसाद कार्यक्रमाला उपस्तिथी दर्शविली. याप्रसंगी सर्वप्रथम भक्तिमय वातावरणात श्रीराम, सीता माता, श्री लक्ष्मण, श्री हनुमान, श्री राधाकृष्ण, श्रीमद् भागवत कथा पुस्तिका अधिष्ठान व हवनाचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले.
तसेच, प्रवचनकार पं. संतोष मनोहरलालजी शर्मा यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद् भागवत कथा व गोपाळकाला कीर्तनाचे श्रवण केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. उपस्थित भाविकांशी विविध विषयांवर संवाद साधून हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. दरम्यान, समस्त कोसंबी (गवळी) ग्रामवासीयांच्या वतीने आमदार बंटीभाऊंचे आगमनाप्रसंगी औक्षण करत स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने प्रवचनकार पं. संतोष मनोहरलालजी शर्मा, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा चिमूर विधानसभा वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार, भाजपा नेते धनराज ढोक, भाजपा नेते विजय ठाकरे, भाजपा नेते हेमंत लांजेवार, भाजपा नेते राजू पिसे, श्री हनुमान देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत चन्नोळे, उपाध्यक्ष भाऊ दडमल, सचिव प्रशांत रंधये, शुभम येरणे व अन्य मान्यवर आणि भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.